Showing posts with label अजय-अतुल. Show all posts
Showing posts with label अजय-अतुल. Show all posts

Wednesday, 27 April 2016

Zing Zing Zingaat | Sairat | Ajay-Atul | Movie Lyrics | Marathi Kavita | झिग झिंग झिंगाट

Zing Zing Zingaat | झिग झिंग झिंगाट
Lyrics: Ajay - Atul
Movie: Sairat | चित्रपट : सैराट
Singer: Ajay - Atul

उरात होतंय धड धड... लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं... ही पिरतीची बाधा झाली

आता अधीर झालोया... बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू... मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट... रंगात आलंया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

आता उतावीळ झालो... गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल... टँटूनं गोंदलं
हात भरून आलोया... लई दुरून आलोया
आन करून दाढी... भारी परफ्युम मारून आलोया
आगं समद्या पोरात... म्या लई जोरात रंगात आलंया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

समद्या गावाला झालिया... माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी... माझ्या लेकराची आई
आता तराट झालुया... तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधावरून... कल्टी मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात... टेक्नो वरात दारात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
 अजय-अतुल

Urat hotay dhad dhad... lali galawar aali
Aan angat bharlay var.. hi pirtichi badha jhali

Ata adhir jhaloya... bagh badhir jhaloya
Aan tujhyach sathi banun majnu... mag aluya
Udatay bungat, paltay chingat... rangat aalaya

Jhal zing zing, zing zing, zing zing zingat
Zing zing, zing zing, zing zing zingat

Ata utavil jhalo... gudhaga bashing badhal
Tujhya navach mi inishal... tatun gondal
Haat bharun aluya... lai durun aloya
Aan karun dadhi... bhari parfum marun aloya
Aag samdya porat... mya lai jhorat rangat aluya

Jhal zing zing, zing zing, zing zing zingat
Zing zing, zing zing, zing zing zingat

Samdya gavala jhaliya... majhya  ghai
Kadhi vhanar tu rani... majhya lekarachi aai
Ata tarat jhaluya... tujhya gharat aluya
Lai firun bandha warun... kalti marun aloya
Aag dhinchyak jorat... techno warat darat aloya

Jhal zing zing, zing zing, zing zing zingat
Zing zing, zing zing, zing zing zingat
_Ajay-Atul

Saturday, 23 April 2016

Attach Baya Ka Bavarla | Sairat | Ajay-Atul | Movie Lyrics | Marathi Kavita | आत्ताच बया का बावरलं

आत्ताच बया का बावरलं | Attach Baya Ka Bavarla
Movie: Sairat | चित्रपट : सैराट
Lyrics: Ajay - Atul
Singer: Shreya Ghoshal


हळद पिवळी ,पोर कवळी ,जपुन लावा गाली
सावळ्याच्या ,चाहुलीनं ,पार ढवळी झाली.
गजर झाला दारी , साजनाची स्वारी .
साजनाची स्वारी आली लाज गाली आली

जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरलं…

साद तू घातली, रान पेटून आली
कावरी बावरी, लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई, घेतलं दमान बाई
चेतल तुफान, साजना
बेभान झाले साजना
नजरला नजरच, नजरन कळलं
मन इवलं, इरघळलं
अन नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरच बया का घाबरलं…

मन झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं
पिरतीचा गंध, आनंद, नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून झालं, समदच ग्वाड
लागलं सजनीला, सजनाच याड

झालीया, भूल ही, उमजली या मनाला
परतूनी, घाव हा, लागला र जीवाला
डोळ झाकलेल बाई, रेघ आखलेल बाई
माग रोखल्याल साजना
उधळूनी गेलं साजना
हरलया पीरमाला, पीरमानं जिकल
झगडूनी मन माझं अदबीनं झुकल
साजना तू, सावरलं…

_ अजय-अतुल

Thursday, 14 April 2016

Man Ranat Gel Ga | Jogwa | Ajay-Atul | Marathi Movie Lyrics | मन रानात गेलं ग | Marathi Kavita

Man Ranat Gel Ga
मन रानात गेलं ग
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Movie: Jogwa | जोगवा
Singer : Shreya Ghoshal
Music: Ajay - Atul

मन रानात गेलं ग,
पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,
अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी
सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या तार्याला 
थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात धुंद धुंद झालं
मन... रानात गेलं ग...

सर्राट ह्या आभाळी
उंच उंच जाऊ ग
वार्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात धुंद धुंद झालं
मन... रानात गेलं ग

_संजय पाटील

Nadichya Palyaad Aaicha Dongur | Jogwa | Ajay-Atul | Marathi Movie Lyrics | नदीच्या पल्याड आईचा डोंगुर | Marathi Kavita

Nadichya Palyaad Aaicha Dongur
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Movie: Jogwa | जोगवा
Singer : Ajay Gogavale
Music: Ajay - Atul

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला
नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणा-नारळानं वटी मी भरीन,
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर

_संजय पाटील

Wednesday, 13 April 2016

Jeev Dangala Gungala Rangala Asa | Jogwa | Ajay-Atul | Marathi Movie Lyrics | जीव दंगला गुंगला रंगला असा | Marathi Kavita

Jeev Dangala Gungala Rangala Asa
जीव दंगला गुंगला रंगला असा
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Movie: Jogwa | जोगवा
Singer : Shreya Ghoshal - Hariharan
Music: Ajay - Atul

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

_संजय पाटील

Thursday, 31 March 2016

Yad Lagla Ga | Sairat | Ajay-Atul | Movie Lyrics | Marathi Kavita | याडं लागलं गं याडं लागलं गं

Yad Lagla Ga | याडं लागलं गं
Movie: Sairat | चित्रपट : सैराट
Lyrics: Ajay - Atul
Singer: Ajay Gogavale and Shreya Ghoshal


याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

चांद भासतो... दिसाचं मावळाया लागलं
आस लागली... मनात कालवाया लागलं

सांगवंना, बोलवंना,
मन झुरतया दुरून
पळतंया कळतंया,
वळतयं मागं फिरून
सजलं गं, धजलं गं,
लाज काजला सारलं
येंधळं हे गोंधळलं
लाडं लाडं गेलं हरून

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

भाळलं असं
उरांत पळवाया लागलं
ओढ लागली
मनात चाळवाया लागलं
सुलगंना, उलगंना,
जाळ आतल्या आतला
दुखनं हे देखनं गं
एकलच हाय साथीला

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

काजळीला उजळलं
पाजळुन ह्या वातीला
चांदणीला आवतान
धाडतुया रोज रातीला
झोप लागना
सपान जागवाया लागलं
पाखरू कसं
आभाळ पांघराया लागलं

याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

_ अजय-अतुल